गुरू
गुरू
1 min
310
मुक्तहस्ताने
त्या बेधुंद लहरी
घेतल्या हाती.
अगम्य आशा
नजरेत भरुनी
झेप घेतली.
हार सोसली
तरी बऱ्याच वेळी
सावरलो मी.
ती एक हाक
धैर्याची अनुभूती
देत राहिली.
हाक होती ती
त्या समस्त गुरूंची
जी ऐकली मी.
घणांचे घाव
घातले जरी खूप
होती काळजी.
वंदन त्यांसी
प्रेमभावपूर्वक
शीश चरणी.
