गुरू ऋण
गुरू ऋण
1 min
488
धावपळीच्या जीवनात, म्हटले घेऊ जरा विसावा
परत उलगडावी पाने, माझ्या मनातील ठेवा
ज्ञानाचे भंडारच जणू उघडले गुरूजींनी आम्हाला
नव्हती कसली अपेक्षा, ना कसला होता मोबदला
त्यांनी दिलेल्या शिकवणीचे मोल आज खरे पटतेय
आपलीच ओंजळ कमी पडली हे प्रकर्षाने जाणवतेय
आता हि मिळेल ज्ञान,मिळतील ही दिग्गज गुरू
पण एकच होता आणि सदैव राहिल आमचा तो कल्पतरू
त्यांनी शिकवलेला राग नि सुर अजुनही कानात घूमतोय
आणि त्यांच्या उणिवेने आज ही हा कंठ दाटून येतोय
समजतच नाहि त्यांचे ऋण हे आम्ही कसे फेडावे
वाटते, त्यांचेच शिष्य म्हणून पुन्हा पुन्हा जन्माला यावे
