गुरू म्हणजे देव
गुरू म्हणजे देव
1 min
200
मुलांना देऊनी आत्मज्ञान
जागरूक त्यांना बनवी
शिक्षणाने होतो विकास
गुरुजीं सदा हेच शिकवी
जगण्याची रीत कळते
शत्रू असो की दानव
गुरुच्या संपर्कात येऊन
बनतात सर्व मानव
गुरु शेवटी गुरु असतो
त्याला जगत नाही तोड
त्यांचे बोलणे ऐकलो नाही
जीवनाला मिळते वेगळे मोड
प्रत्येकाला असतो गुरु
त्याविना मिळत नाही यश
आपल्या अज्ञानामुळे
कोणी ही करतो वश
म्हणून गुरुला देव मानूनी
सदा त्यांची सेवा करू
शिक्षकदिनाच्या निमित्ताने
सद्विचाराची कास धरू
