गुरुपौर्णिमा
गुरुपौर्णिमा
1 min
236
मातृदेवोभव पितृदेवोभव
वेदांनी आरंभीच केला गौरव।
पहिला गुरु असते आई
चांगले संस्कार देई ठाई ठाई।
दुसरे गुरु असतात वडील
गर्दीत सावरतात आपले पाऊल।
लहानपणी खांद्यावर घेऊन
जग हे दाखवी
काय वर्णू मी त्यांची महती।
गुरुची थोरवी मी वर्णू काय
मातीच्या गोळ्याला देती सुंदर
आकार,
वंदू त्यांचे पाय ,देता आपल्याला
ज्ञानाचे भांडार।
लहान थोर सगळे गुरु माझे असती।
शिकवी दाण्याची मेहनत इवलीशी
मुंगी ती।
निसर्गाच्या कणाकणात गुरु दिसती मजला।
शिकते मी प्रत्येकाचा गुण चांगला
शिकते मी प्रत्येकाचा गुण चांगला
