गुरुपौर्णिमा
गुरुपौर्णिमा
1 min
187
आई वडील प्रथम माझे गुरु
कौतुके शिकवी संस्कार , आदर।
तेच मजसाठी देई प्रेमाने
सुख दुःखात आधार।
लहान थोर गुरु माझे असती
शिकवती मज काही नवे।
घेते धडा त्याच्याकडून
जे मज वाटे चांगले ते हवे।
शिक्षक गुरु असे बालपणापासून
देई मज ज्ञान प्रत्येक विषयाचे।
चरणी माथा त्यांच्या त्यांनी
दिले मज सार आयुष्याचे।
प्राणी लहान शिकवी मज धडे
मुंगी ही घेऊन साखरेचा दाना।
भिंतीवर चढे कितीदा धडपडे
जिद्द शिकते मी, फक्त लढ म्हणा।
