STORYMIRROR

Gangadhar joshi

Others

4  

Gangadhar joshi

Others

गुरुदेव

गुरुदेव

1 min
413

सगुण निर्गुण

कैवल्य चंदन

तुझ्या मूर्ती पाशी

करतो वंदन 


आलो तुझ्या भेटी

घेतलं दर्शन

भारावले मन

झाले नंदनवन


जन्माचे हे पुण्य

जाहलो मी धन्य

दिसले चरण 

श्री अत्रीनंदन


भेटी मझ आस

लागे रात्रंदिन

पादुका पालखी

रोज मिरवीन 


Rate this content
Log in