गुरुचे महत्त्व
गुरुचे महत्त्व
1 min
402
आई गुरुमाऊली |सुंदर जग दावी ||
नतमस्तक पायी | सदाचसे ||
आईची शिकवण | अनमोल संस्कार |
थोर तिचे उपकार | कितीतरी||
छाया पित्याची |जीवन आदर्श घडवी|
पित्याच्या छञाखाली |सुखरुप||
विद्येच्या या मंदिरी |ज्ञानाची माऊली |
अज्ञानाच्या मार्गी |ज्ञानज्योत ||
असत्याचा अंधःकार |असे चोहिकडे
सत्याचे दर्शन घडे |शिकवणूकीत||
अनैतिकतेचे वारे| वाहे जगामंदी||
रुजवण मूल्यांची| देतसे||
गुरुंचा महिमा अगाध |वर्णावा किती|
आदर हृदयी |कायमच||
