गुरुचे महत्त्व
गुरुचे महत्त्व
1 min
352
नाही गुरुविना शक्य
जगी भले कुठे काही..
सांगे येथे साधू संत
बाकी जगी मुथ्या काही..
मानुनी गेले रे पुर्वी
गुरु परब्रह्म मुर्ती ..
नाही असा रे सोबती,
घडे कशी मग किर्ती..
खरा परमार्थ येथे
लाभे असे रे संगती..
पेलूनी शिवधनुष्य
शिष्य घडे रे युगती..
सारथी होऊनी गुरु
सदा उभा असा राहे..
ईडापिडा मग त्याची
कुठे भला येथे राहे ...
म्हणून मी मानतो रे
गुरू परब्रह्म सदा..
लाभे ज्याला फुले मग
जीवन रे भाऊ सदा..
