गुरु
गुरु
1 min
329
गुरु देतो आपल्याला ज्ञान
अरे मानवा गुरुचे महत्त्व जाण
जगती ह्या जगण्याला देई अर्थ
गुरूच्या साथीने जीवन होई सार्थ
शाश्वत ज्ञान देतात गुरु
ज्ञानाची भूक होते सुरु
गुरु आपला निवडावा काळजीने
वाममार्गाला लावणारा सोडावा लगबगीने
गुरूंचे महत्त्व जाणावे
गुरूंचे शिकवणे आचरावे
आयुष्याची वाट होईल सुकर
जेव्हा असेल गुरूच्या हात डोक्यावर
