गुरु
गुरु
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ...
जगात पहिली गुरु असते आपली आई ...
तीच आपल्याला जगाशी ओळख करून देते ...
सगळ्याशी आपले नाते पटवते ...
उचारायला तीच शिकवते ...
चिऊ काऊ शी मैत्री तीच करून देते ...
लहापणीची आपली बोबडी भाषा तिलाच समजते ...
आपण शिकावं म्हणून तीही तशीच बोलते ....
बोटाला पकडून चालणं तिच शिकवते
पाटीवरचा पहिला श्री गणेशा ती आपला हाथधरुन गिरवते ....
संस्काराचे बीज तिच्याकडूनच आत्मसात करतो ....
तिच्या सावलीतून शाळा नावाच्या दुनियेत जातो ...
तिथे गुरुजी बाईना भेटतो ...
ते शिकवतात नवीन धडे कविता आणि नव्या गोष्टी ...
ओरडा खावा लागतो जर गेली मस्ती ...
इयतेची आयुष्य भरभर निघून जातात ...
कॉलेज विश्वात आणून सोडतात ....
तिथे हि गुरु भेटतात प्रोफेरसरच्या रूपात ....
त्त्याचे मागर्दर्शन उपयोगी पडते भविष्यात ....
तसे आपल्या आजूबाजूला गुरु बनणारे खूप असतात ...
कोणी ढोंगी असतात तर कोणी खरे मार्गदर्शक ...
गुरुच्या शिकवणीचे महत्त्व आपल्या आयुष्यात उपयुक्त ठरते ...
आपण राजा किंवा रंक वाहायचे हे तेच ठरवते ....
