गुरु
गुरु
गुरु ज्ञान दृष्टी,गुरु अभ्यास मुर्ती,
अज्ञान घालवी गुरु, गुरु प्रकाश,
कलेचा विस्तार ,नसे चमत्कर,
अंधश्रद्धा नाही,श्रद्धा निश्चित, गुरु ठाई.
जन्म जरी असे हात,पाय देह,
नसे भाषा काही,नसे खाणाखुणा,
हसते बाळ, बोलते आई,
बोबडे बोल भाषेचे ज्ञान,
आई एक महागुरू.
आलो जिवणासी ज्ञान नसे काही,
कोवळे रोप, बीज फोडुन आले,
नसे त्यासी ज्ञान, होईल मी वटवृक्ष,
गुरुने दिली पाणी आणि उर्जा,
पहा त्याची छाया पसरली किती .
गुरुची वाणी शिष्याच्या कामी,
गुरु उपदेश, महान महान,
दुधाचे अंगी नवनित आहे,
तापावे दूध आधी, आधी.
गुरुचे पहाणे, गुरुचे चालणे,
बोलणे गुरुचे, ज्ञान गुरुचे,
मज देही, गुरु महान, गुरु महान,
अंधाराला प्रकाश गुरु एक.
अर्जुनाच्या अंगी घाम घाम,झाला,
माया त्यास सोडेना, मना आले दैन्य,
विसरला सारा धनुर्वेद,
क्षत्रिय तू धनुर्धर, वीरश्री तुझे,अंगी,
युद्धामध्ये रुदन नसे क्षेत्रिया.
क्षत्रिय अर्जुन जागा केला,
कृष्णकृपे अर्जुन नायक झाला.
