गुरु(अभंग)
गुरु(अभंग)
1 min
504
सदा मार्गदर्शक ! ज्ञानाचा सागर !
प्रेमाचा आगर ! गुरुजन ! !
त्यांच्यामुळे होते ! ज्ञानासंगे गाठी !
धाव मदतीसाठी !त्याची असे ! !
तुम्ही शिकवले !उभे राहण्यास !
सत बघण्यास ! समाजात ! !
अन्यायाविरुद्ध ! बल दिले तुम्ही !
अवलंबु आम्ही ! सदमार्ग ! !
दिन हा भाग्याचा ! लाभ आम्हा झाला !
आशीर्वाद दिला ! जगण्यास ! !
दक्षिणा आमची ! जीवनी एवढी !
प्रत्येक कवडी ! देवासाठी ! !
