STORYMIRROR

Murari Deshpande

Others

3  

Murari Deshpande

Others

गुरेही म्हणाली

गुरेही म्हणाली

1 min
174

गुरेही म्हणाली |अडकता लालू |

भलताच चालू |इसम हा ||


पळविला घास |लक्षावधी टन |

कमविले धन |वाममार्गी ||


आले रे वाढून |करणीचे भोग |

तुरंगाचे योग |आपोआप ||


आमची वासरे| मेली रे उपाशी |

तेव्हा हा तुपाशी |खात होता ||


आहे अजूनही |देवाघरी न्याय|

बुडत्याचा पाय |खोलामध्ये ||



सांगतो मुरारी |त्रिवार हे सत्य |

खाण्याचेही पथ्य |असते रे ||


Rate this content
Log in