गुंतागुंत मनाची
गुंतागुंत मनाची


गुंतागुंत मनाची
प्रियतमा व प्रियकर
भेटले नदी तीरावर
नजरेला छेदले नयन बाणाने
प्रेमात पडले नवआकर्षणाने...
पावसात चिंब चिंब भिजले
दोघांचेही अंग अंग मोहरले
झाली गुंतागुंत मनाची
सुरुवात झाली खऱ्या प्रेमाची..
झुळूक आली हळुवार वाऱ्याची
बरसात झाली प्रीतीची
देवघेव झाली विचारांची
सुरुवातच ही नव आयुष्याची..
नको शिरकाव त्यात कुणाचा
शंका द्वेष आणि मस्तराचा
लाभो सदैव आनंदाचा ठेवा
जीवनी शाखा आनंदमेवा...
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा- पुणे
मो. नं. 9823582116