गुण गाऊ किती तिचे
गुण गाऊ किती तिचे
1 min
287
गुण गाऊ किती तिचे
जिने जपले नऊ मांस
अस्तित्व होतं माझं छोटं
जेव्हा तिच्या उदरात
गुण गाऊ किती तिचे
जिच्यामुळे मी आहे आज
किती प्रेमाने भरवायची
चिऊ काऊ चा तो घास
गुण गाऊ किती तिचे
ती आहे माझी माय
तिच्या कुशीची सर
आकाशातील स्वर्गाला बी नाय
