गुन्हेगार मी तुझा...
गुन्हेगार मी तुझा...
कुंद कुंद या श्वासांची ,
वाट मोकळी होई ना ,
हृदयात साठलेल्या क्षणांचे ,
निचरून पाणी वाहे ना ,
अपराध माझा घोर झाला ,
मनास तुझ्या मी तोडले ,
गुन्हेगार मी तुझा कधीचा ,
ओझे हे डोळ्यांत वाहणे ...
थांबव कसा हा जीवघेणा प्रवास ,
मनात चाले घालमेल ,
हात तुझा हाती ना राहला ,
तुझ्याशिवाय या जीवनाचा ,
अर्थ ही हरवला ...
संपवून सगळे जिंकलो मी ,
जिंकुनही कसा जीव घाबरला ,
तूच हवीस मजला ,
शब्दं शब्द गहीवरला ,
हुंदका दाटून म्हणतो ,
स्वरांत सूर तुझा मिळव ना ...
ये ना तू पुन्हा जीवनात माझ्या ये ना ,
थांबलेल्या स्पंदनाना आयूष्य दे ना ...
कुंद कुंद या श्वासांची ,
वाट मोकळी होई ना ,
हृदयात साठलेल्या क्षणांचे ,
निचरून पाणी वाहे ना ,
अपराध माझा घोर झाला ,
मनास तुझ्या मी तोडले ,
गुन्हेगार मी तुझा कधीचा ,
ओझे हे डोळ्यांत वाहणे ...
