गुलमोहर...!
गुलमोहर...!
1 min
328
गुलमोहर
झाडावर फुलला
तोल हा गेला
लालचुटुक
केसरी रंग त्याचा
शोभतो साचा
गाली हसला
मनमोर फसला
नाद कसला
मनमोहक गोडी
नाते वेगळे जोडी
काढून खोडी
नित्य पाहता जरा
दाखवितोच तोरा
नादात जरा
म्हंटले बघ जरा
डोळे ते उघडून
थोडे सावरुन
प्रेमातच पडला
आणि उगा लाजला
घोटाळा झाला
आता लाईन देतो
लाजून मुरके घेतो
आणि बघतो
म्हणतो मला
मी प्रेमात पडलो
आणि अडलो
प्रेम त्याचे लाभता
येता थोडी सावली
घडी बसली....!
