STORYMIRROR

Urmi Hemashree Gharat

Others

3  

Urmi Hemashree Gharat

Others

गुलमोहर

गुलमोहर

1 min
11.5K

चैत्रपालवी अंकुरली मोहक

गुलमोहरास बहर आला

 याद आली पुरानी

मनपाखरु सांगुन गेला


पाऊलखुणा ओळखीच्या हसल्या

संगती त्या हळव्या उठल्या

रमत गमत बंधने जुळली

पापण्याही मग अलगद मिटल्या


खोडकर वारा बेफाम

गुलमोहराच्या पायथ्याशी सजला

बिनधास्त मैफिल रंगली

श्वास आठवणीत रुजला


दवबिंदु सोनेरी चमकले

 ओळखीची ती साद येता

उगाच पुन्हा हरवले

तुला नव्याने पुन्हा आठवता


Rate this content
Log in