STORYMIRROR

Mrudula Raje

Others

3  

Mrudula Raje

Others

गुलमोहर

गुलमोहर

1 min
12K

पूर्वेला उदयाचलावर रक्तवर्णी सूर्याने उघडले डोळे।

उधळू लागला तो अवनीवर लालिम, तेजस प्रकाश गोळे ॥


सूर्याचे ते तेज झेलणे, नव्हते साधे, सहज अन् सोपे।

आदित्याच्या लहरी झेलता, कोमल धरणी थरथर कापे ॥


भूमिपुत्र त्या पलाश वृक्षाला, नच साहवे त्रास हा धरतीचा।

निश्चय त्याने केला, घडवू दिवाकरास प्रवास परतीचा ॥


सूर्याचे ते रक्तरंजीत तेज घेतले तयाने शोषून।

पांगारा पांघरतो शेला, कुमकुम - सिंदुर अंगी शिंपून ॥


त्या मायेच्या छत्राखाली धरणी आई निवांत बसली।

भास्कराच्या कोपामधुनी पलाश वृक्षामुळे वाचली॥


लालबुंद फुलला गुलमोहर, सृष्टीला देतो संजीवन ।

ग्रीष्माच्या काहिलीमध्ये बरसवतो सुखद आनंदघन ॥


Rate this content
Log in