गुलमोहर..!
गुलमोहर..!
1 min
287
वसंत येता
गुलमोहर फुलतो
आनंद जीवनी
तयास पाहून ओसंडतो
लाल केसरी
उधळण मनोहर रंगाची
किमया सारी
तुझी देवा कायमची
त्यात पाहता मी तुला
अंग सारे शहारते
कधी नव्हे ती माया पाहून
काया सारी मोहरते
अशीच जीवनी
आनंदाची उधळण
देवा तव कृपेने
सदैव आमच्या होउ दे
तुझ्या सानिध्यात देवा
वसंत जीवनात आमच्या
सदैव विविध रंगांनी
अखंडित फुलून राहू दे......!
