गुलामगिरी
गुलामगिरी

1 min

22
रातंदिवसाची धावपळ
कशासाठी तर पोटासाठी
पोट भरलं तरी ही सवय
लागते धावायची पैशापाठी
सारे जवळ असले तरी
वेळ नाही थांबण्यास
आजूबाजूच्या गमती
मिळत नाही पहाण्यास
असूनही मिळवण्याच्या
गाडी, बंगला, चाकर,
बनतो गुलाम सवयींचा,
पुरे न का एक भाकर?
पहाटेचा गार, शांत वारा
श्वासात कधीतरी घ्यावा
सुर्याची किरणे पसरता
पक्ष्यांचा कलरव ऐकावा
पुनवेच्या टिपूर चांदण्याने
न्हाऊ घालावे तनाला
ढगां आढचा चांदोबा दिसता
आनंद भरू द्यावा मनाला
पैसाच नसतो सर्व काही
बुद्धीला कसे पटवावे
या छोट्या छोट्या गोष्टींनी
आयुष्य हे कसे नटवावे!