गुलाबी उषा
गुलाबी उषा
1 min
240
नजरेनं निसर्ग न्याहळणार
पानांची जाळी विणणार
गुलाबी या उषासंगे मग
हिवाळ्याचा आनंद घेणार...
सजणाच्या साथीनं छान
पहाटेच फिरायला जाणार
गुलाबी या उषामधे बेधूंद
हातात हात घालूनी मजा मारणार...
पहाटेच्या धुक्यात हरवणार
गुलाबी उषेच्या स्वाधीन होणार
वसुंधरावरील सृष्टी उपभोगणार
मयूर बनून धुंदीत विहरणार...
सजणाची साथआहे मला
उंच उंच गगनी झेपावणार
इंद्रधनुच्या झोपाळ्यावर
मस्त झुला घेत स्वप्ने रंगवणार...
