गुलाबी डायरी
गुलाबी डायरी
केल्या कैद डायरीत ....
आपल्या गोड आठवणी.
आठवणीच्याच तर आहेत ...
सगळ्या साठवणी.
तुझी माझी पहिली भेट.
आहे डायरीत जपलेली,
पहिली कविता आहे अजूनही,
जी तुझ्या साठी लिहलेली.
गूलाब तू दिलेला....
गेलाय पार सुकून,
पण पाकळ्या मात्र गुलाबी
अजून ठेवल्यात जपून.
पहिले भेटकार्ड....
उघडून जेव्हा पाहिलं,
आय लव यू चे गीत ....
त्यातून ऐकू आलं.
सेल त्या ग्रीटिंग चे गेले कधीच संपून,
तरीसुद्धा ते ठेवलय अजूनही जपून.
तू दिलेले प्रेमपत्र ते मात्र हरवलयं,
पण मजकुर त्यातला मनावर कोरलय.
जिथे असशील तिथे सुखी रहा,
हीच प्रार्थना करेल ईश्वर चरणी.
मनाच्या बंद कोपऱ्यात,
जपून राहतील...
त्या गोड गुलाबी आठवणी.
