गुढीपाडवा
गुढीपाडवा
1 min
188
उगवली चैत्राची सोनेरी प्रभात
नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात
शुभदिनी या गुढी उभारू नवचैतन्याची
उत्साह, स्नेह अन् वात्सल्याची
पाने पंचक आंब्याची साक्ष देती मांगल्याची
नजरेत सजवावी प्रेम मूर्ती वात्सल्याची
माळ साखरी गोडवा जीभेवर रेंगाळावा
कडूनिंब सेवनाने तमोगुण दूर व्हावा
वस्त्र रेशमी पताका उंच उंच लहरावी
सद्भावनेची महती सर्वदूर पसरावी
नवबहर झेंडूचा मनी केसर रुजावा
रांगोळीच्या नवरंगानी नित्य खुलून दिसावा
चैत्रपालवी कोवळी सोन झळाळी किरणी
देते शुभेच्छा मनस्वी पाडव्याच्या या शुभ दिनी 🙏
