गुढी पाडवा
गुढी पाडवा
नैराश्याची मरगळ दुर करा
लढाऊ बाणा अंगिकारा
कठीण परिस्थितीवर मात करा
नवचैतन्याची गुढी उभारा
आहे तापदायक दुष्काळाचा फेरा
पाणीबचतीच्या मंत्राचा जप करा
आटू नका देऊ माणूसकीचा झरा
जल संवर्धनाची गुढी उभारा
नको आपल्या परिसरात केरकचरा
स्वच्छ व निरोगी आयुष्याची कास धरा
आधी स्वतः पासुन सुरुवात करा
स्वच्छतेची गुढी उभारा
देशप्रेम जरुर व्यक्त करा
देशद्रोहाला नका देऊ भारा
देशविरोधी शक्तींचा बिमोड करा
राष्ट्रवादाची गुढी उभारा
जातियवादाला दूर सारा
एकत्र येऊन प्रगती करा
माणुस या दैवी निर्मितीचा आदर करा
समतेची गुढी उभारा
