STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

गतकाल

गतकाल

1 min
219

सुखदुःखाच्या क्षणांचे साल सरलं सरलं

अंतरात खोलवर त्याला कोरलं कोरलं॥धृ.॥


दोन हजार वीस साल सरलं सरलं

या सालानं बाई मला अमाप सुख दिलं 

स्मृती आहेत अगणित या सरल्या सालाच्या

काही बोलून दाखवलं काही मनात ठेवलं....॥१॥

सुखदुःखाच्या क्षणांचे साल सरलं सरलं......


कोरोनाने हैदोस घातला ग बाई

हे साल बाई मी जरा चिंतेत घालवलं

पूर्ण जगच बाई या महामारीत खचलं

मानवाचे विविधपैलू या नयनात साठवलं साठवलं.....॥२॥

सुखदुःखाच्या क्षणांचे साल सरलं सरलं......


मुलाला अमेरीकेत एम.एस.साठी ॲडमिशन मिळालं

गुपीत माझ्या मनातलं त्यानं ताडलं ताडलं

हे पाहूनी आनंदाश्रूंनी नयन भरलं भरलं

नातेवाईकात बाई मुलानं नाव काढलं काढलं....॥३॥

सुखदुःखाच्या क्षणांचे साल सरलं सरलं.....


गोड आठवण या सरत्या वर्षाला साठवली

काव्यसंग्रह "बालकाव्यांकुर" मधे काव्य बाई छापलंं

ह्रदयी अत्तर कुपी,मनी मोर नाचू लागलं लागलं

समाजात वसुधाचे नाव आता उंचावलं उंचावल...॥४॥

सुखदुःखाच्या क्षणांचे साल सरलं सरलं....


सरल्या सालात मान मिळाला आदर्श शिक्षिकेचा

सत्तावीस फेब्रुवारीला वसुधाचे मन पुरस्कारात रमलं रमलं

हे कौतुक पाहून कुटुंबाचं मन हेलावलं हेलावलं....॥५॥

सुखदुःखाच्या क्षणांचे साल सरलं सरलं....

अंतरात खोलवर त्याला कोरलं कोरलं.......


Rate this content
Log in