गर्व
गर्व
1 min
372
माज आहे गरिबीचा
म्हणून चाकरी करतोय
आज्या वडिलांची जमिन विकून,
भाकरी कमवतोय
मातीत नाळ आमची
पायाने तुडवेना वाटा
म्हणून गाड्या
हप्त्यानं घेतोय
चोवीस खणाचं घर वाकलं
आडिशेच्या वाड्यात
स्वर्ग शोधतोय
उपळासारखी दलदलीत
कर्ज बेहिशेबी झालं
दरवाजे शोधतोय
गर्व भवला ढिगाऱ्यामध्ये
श्वास अडकला
लाचारीमध्ये
माज आहे गरीबीचा
गर्व धुडकावून
मनातला
साज रचतोय
आठवणींचा
