ग्रंथालय
ग्रंथालय
1 min
11.5K
तिथे नाही आता फिरकत कोणी
गजबजलेला असायचा ठिकाण ते एकेकाळी
वाचकाचा गराडा असायचा चोहोबाजूनी
कोणी तिथे वाचायचे तर कोणी घेऊन जाई घरी
हळूहळू बदल होऊ लागला
आधुनिक झाला जमाना
पुस्तकांना डिजिटल बनवला
एका क्लीकवर दिसू लागली पुस्तके
मग कोण जाणार बाहेर
वाट पहाता एकांतात आता एकटी पडली आहे ग्रंथालयाची पुस्तके