गर्जा महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा
माझ्या महाराष्ट्रा
तुझी बहुत असे ख्याती
इथे संतांच्या स्पर्शाने
पवित्र झाली माती
इथे शूरवीर हे घडती
जन्मते विरांगनाची महती
नृत्य, लावणी,भारुड,
अभंग, पोवाडा
माय मातृभाषेच्या अनेक चालीबोली
सह्याद्रीचा सिंह गर्जतो
शिवशंभू राजा
इतिहासाची साक्ष ह्याला संस्काराची शिदोरी
वैभवाचा वारसा अन्
संस्कृतीची गोडी
शास्त्राची जाण इथे
संतांची वाणी
टिळक, सावरकरांचा लढा,
शाहू -फुले -आंबेडकरांचा वारसा बघायला मिळे
भोसले, पेशवे यांच्या शौर्याची कहाणी
कुसुमांची बाग इथे वसती, सुमने या राष्ट्रावर उधळती
कोकणातला आंबा
इथे पैठणची जरी
साहित्य, संत परंपरा
इथे वाचायला मिळे
ज्ञानेश्वरांच्या अर्थपूर्ण ओवी
गर्जा महाराष्ट्र माझा करू जय जय कार
त्याचा कामगारांचा राष्ट्र म्हणून गाजला
भारत देशाची शान असे
मराठी माणसांचा मान
होऊन हर्षित गातो
आम्ही थोरवी महाराष्ट्राची
नमन तुजला करितो आम्ही तू पवित्र भूमी संताची
स्मरूनी हुतात्म्यांचे बलिदान
गर्वाने सांगतो आम्हा सर्वांना
महाराष्ट्राचा असे अभिमान
