गरज वृक्षाची
गरज वृक्षाची
1 min
466
गरज वृक्षांची..
शहरीकरण झाले वेगाने
कत्तल वृक्षाची झाली
जुने गेले सरसकट
नव्याचे अधिराज्य आले..
वातावरण तप्त होता
ए.सीची गरज वाढली
सायकल गेली अडगळीत
चारचाकी घरोघरी वाढली
पृथ्वीची झाली दैना
हा माणुस काही ऐकेना
ऐशोरामासाठी यंञाचा अतिवापर करुन
निसर्गाशी करी प्रतारणा
असेच चालले हे जर
पृथ्वीचे अस्तित्व धोक्यात येईल
वेळ जाण्यापुर्वी लक्षात ठेवावे
वृक्षाची गरज अत्यावश्यक होऊन जाईल.
