STORYMIRROR

Babu Disouza

Others

3  

Babu Disouza

Others

गरज लढ्याची

गरज लढ्याची

1 min
213

लढा म्हणून पाठीवर थाप मारणारे नाही कोणी

लढावे कुणाशी कुठे नि कसे सांगणारे नाही कोणी


लपले भेकड उघड वार करणारे नाही कोणी

अंधारातली कृष्ण कृत्ये सुरक्षा देणारे नाही कोणी


शत्रूला देती पैशासाठी खबरी स्वार्थी ते पाठी

कमकुवत करती लढा दुहीने सत्ता, पदासाठी


जयचंद निपजले विश्वासघाती सूडांध होऊन

दगाबाज राष्ट्रद्रोही शत्रूसामील धर्मांध होऊन


व्यर्थ जातो लढा प्राणाहुती देऊनही अशा कृत्यांनी

अर्थ असावा लढ्याला चाचपडणे नको अंदाजांनी


दुर्लक्षतात लढा अहंकारी गुर्मीने अनुल्लेखाने

इतिहास घे नोंद सर्वांची अंतराय बुध्दीभेदाने


साम दाम दंड भेद दमन कराया स्वर विद्रोही

दैवे दिली सत्ता माजू नये उतू नये काल प्रवाही


संकुचित झाली मने राहिली ना जिद्द संघर्षासाठी

उदासीनता पसरलेली लढते कोण कशासाठी


उर्मी लढण्याची जागवा शब्दांनी अंतरी पुन्हा कोणी

संदर्भ बदलता व्याप्ती बदले नव्याने व्याख्या कोणी


Rate this content
Log in