STORYMIRROR

Veena Chavan

Others

3  

Veena Chavan

Others

ग्रीष्मातलं जंगल

ग्रीष्मातलं जंगल

1 min
197

ग्रीष्माच्या तप्त झळानीं

सुकलेलं जंगल

कोरडं रखरखीत

आणि खोल गहीऱ्या शांततेतलं,

पायाशी सुकलेल्या पाचोळ्याचा

गच्च थर

एकावर एक पसरलेला,

पाय पडताच कर्रर्र

आवाज कानात घुमत राहणारा 

झाडांझाडावर शाकारून

राहिलेल्या वेंली

आता बऱ्याच आक्रसलेल्या 

आणि तरीही

पांढऱ्या शुभ्र चांदण्यांसारख्या 

अनंत फुलांनी उमलून आलेल्या 

एकही पान नसलेल्या फांदयावर 

आगीच्या लाल भडक

ज्वाला अंगावर मिरवत

पांगारा

दिमाखात उभा असलेला

आणि 

ग्रीष्माच्या झळा सुसह्य करत

आपल्या रखरखीत कॅनव्हासवर 

अशा अनेक सुंदर चित्रांनी

खुणावत,

जंगल उभं असलेलं


Rate this content
Log in