STORYMIRROR

Sarika Jinturkar

Others

3  

Sarika Jinturkar

Others

गरीबीचे निर्मूलन

गरीबीचे निर्मूलन

1 min
197

 चिंतातूर डोळे पापण्याआड आसवांचा पूर 

पाठीवर बिर्‍हाड डोक्यात प्रश्नांचं काहूर 


दिवस रात्र पोटाच्या आगीसाठी चालते पावलांची वणवण

 श्रीमंती च्या पायी गरिबांचा होतय आहे रणकंदन 


 जन्मास येते गरिबी कुणाची चूक आहे 

भेटायला भाकरीला निघाली भूक आहे 

गरीब कायम गरीब राहावा हा कोणता आहे न्याय..?

 भूक तहान कपडालत्ता यासाठी 

नेहमीच का होतात त्यांच्यावर अन्याय..

 शेकडो हात मदतीचे एकही येईना का हाती

 हाता वरची पोट त्यांची तरी का होते रीती ..?


 घोषणा होतात म्हणतात सगळे करू या गरिबीचे निर्मूलन

पण खरंच का करत कोणी गरीबीसाठी आंदोलन..?


टिचभर पोटासाठी त्यांचा मैल न मैल प्रवास  

कागदाच प्रगती सारी अन् दिसून येतो कागदीच विकास 


 काम,दाम-दंड-भेद होऊ द्यावे आता समांतर 

तरच देऊ शकतो आपण गरिबीला अंतर 

  

तेव्हाच शक्य होईल गरीबीचे निर्मूलन 


Rate this content
Log in