STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

गरिबी वेदना आंनदी

गरिबी वेदना आंनदी

1 min
188

गरिबीच्या पलीकडे

माझ्या सौख्याची वाडी आहे

जरी अंगावर माझ्या

आज फाटकी साडी आहे...


वेदनेची माझ्या

माझ्या लेकरास जाण आहे

पाठीवरी माझ्या त्याच्या

आशेची थाप आहे...


श्रीमंत मी या जगी

पाठीवर सौख्याची बँक आहे

हास्यात माझ्या त्या बँकेची

खरी शान आहे..


मी हसते लाजते

तोंड ही कधीकधी विचकटते

पण आंनदात माझ्याच मी

खरोखरच मस्त आहे ...!



Rate this content
Log in