STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

ग्रहीणींची किमंत

ग्रहीणींची किमंत

1 min
319

गृहिणींची किंमत ..... 

वाटलं 

कधी-कधी आॅफिस मध्ये जावं

  अन् पैैसेे कमवावे

किंमत नसते हो एका स्त्रीला

जी घरी राहून पैसे कमावते

दिवसाचे पंधरा तास काम करुनही

तिची किमंंत शूून्यच असते..... 

तरीही कामाचे पैसे

ती कधी मागत नसते..... 

आठवडयाचे सातही दिवस

ती काम करत असते

एक दिवस सुट्टी घ्यावी म्हटली तर

घरच्याच्या डोळयात खुपते..... 

घर खर्च्चातले पैसे साठवून ती

सगळयांंनाच काही ना काही घेत असते

स्वत:ची इच्छा बाजूला सारून

इतरांचा विचार अगोदर करते..... 

अन्न वाया जाऊ नये म्हणून

ती शाळा अन्न ही खाते

तरिही तिचा काहीही उपयोग नाही

असंच सगळयांना वाटते..... 

ती पण एक माणूस आहेे

हीचा विचार कोणी करत नाही

तिला टोचूून बोलण्याची

एक संधीही कोणी सोडत नाही..... 

कारण ती एक गृहिणी आहे.!!!!!. 



Rate this content
Log in