गर्भपात
गर्भपात
मुलगा कि मुलगी
होणार म्हणून करत
होते गर्भपात
पण मासिक पाळीच्या दिवशी
मंदिरात प्रवेश केला तर
लागते यांना पाप
असंख्य जीव पोटात मारून
केले यांनी काय
पैशासाठी डाॅक्टर ने स्वतःलाच
विकले कि काय
मुलगा झाला म्हणून वाटतं
होते गावभर पेढे
आता तोच मुलगा वृध्दा
अश्रमाची वाट दाखवून
ठरवतो वेढे
मुलींची हत्या करून
मुलाला बायको मिळेना
लग्नाला
मुलींची संख्या कमी करून
काय साध्य करून दाखविले
जगाला
मुलगी झाली म्हणून हक्काने
सांगतो जगाला
सुखत नाहीतर दुखःत दोन
अश्रू गाळायला
काय हा जमाना आला
मुलगा नको आम्हाला
मुलगी आमच हेच सर्वस्व
ओरडून सांगू लोकांला