STORYMIRROR

Savita Kale

Others

4  

Savita Kale

Others

गर्भकळी

गर्भकळी

1 min
114

कुजबूज कुजबूज गर्भामध्ये

नित तिची चालली होती

सुंदर फूल होण्यासाठी

एक गर्भकळी आसुसली होती


गर्भनिवाऱ्यात अनेक स्वप्ने

डोळे मिटूनी पाहत होती

तिच्या भावंडास भेटण्या 

एक गर्भकळी आसुसली होती


आईच्या गोड शब्दांना

हुंकार आतून देत होती

स्पर्श आईचा होण्यासाठी 

एक गर्भकळी आसुसली होती


सुंदर जग मलाही पहायचंय

यासाठी ती धडपडत होती

सुंदर जगी या जन्म घेण्या

एक गर्भकळी आसुसली होती


शब्द अचानक कानी पडले

ऐकून आज ती थरथरत होती

मुलगी आहे गर्भात म्हणुनी

आई तिची रडत होती


जीवास धोका जाणुनी आपल्या

गर्भकळी भेदरली होती

काय करावे? कुठे लपावे?

जागा सर्वत्र शोधत होती


मार्ग दिसेना कोठे तिजला

हिरमुसून ती बसली होती

स्वप्ने सारी जळून गेली

रूदन आतुनी करत होती


हात काळाचे येता जवळी

प्रचंड आकांत करत होती

काय चूक रे माझी देवा? 

प्रश्न विधात्यास करत होती


श्वास संपला बघता बघता

निपचित आत ती पडली होती

फूल होऊनी सुगंध देण्यास

एक गर्भकळी आसुसली होती

एक गर्भकळी आसुसली होती


Rate this content
Log in