STORYMIRROR

Pandit Warade

Others

4  

Pandit Warade

Others

गर्भातली कळी

गर्भातली कळी

1 min
552


गर्भातल्या कळीचा अपराध काय सांगा।

कैसी कठोर झाली इतुकीच माय सांगा।।


माणूस माणसाची माणूसकी विसरला।

का चालले तयाचे डोहात पाय सांगा।।


माता, बहीण, पत्नी पुरुषास पाहिजे मग।

'मुलगी नको प्रपंची' यावर उपाय सांगा।।


प्रेमात प्रेम मोठे विश्वात थोर माता।

लेकीस मारतांना ममता कुठाय सांगा।।


संवेदना जगाची सांगा कुठे हरवली।

पडला मनामनाशी का अंतराय सांगा।।



Rate this content
Log in