ग्रामीण जीवन
ग्रामीण जीवन
फलटण गावी खूप पूर्वी
होतो आम्ही राहायला
आता आलो पुणे शहरात
विद्येच्या या माहेरघराला.....
खेड्यात घर जवळ असायची
पण माणूसकी होती माणसात
नाही लढणे,झगडणे कधीही
कुटुंबात किंवा आपापसात....
वासूदेव येई दारी पहाटवेळी
कुडूमुडू ऽऽ वाजवी म्हणे गाणे
उठवी सर्वांनाच प्रभात समयी
मुलं बाळं ताल धरून म्हणे तराणे....
शेजारीच असे घरामागे विहीर
आई जाय पाणी मग शेंदायला
तिच्याबरोबर आम्ही विहिरीवर
जायचो आईच्या हो मदतीला...
दारात तुळस वृदांवन छानसे
वृक्षवेलींची दाट राई अंगणात
पारावर बसून वृद्धांच्या चाले गप्पा
चांदण्या मोजण्यात मुलं गर्क नभांगणात....
घुंगराची शानदार राजासर्जा बैलगाडी
खडखड वाजणारी वळणाची ही वाट
गाडीवान दादा "हे,राजा हे,सर्जा"म्हणत
चढतेय घुंगरूगाडी डोंगर-दरी घाट....
