ग्रामीण भारत
ग्रामीण भारत
भारत फक्त शहरात नाही
तर खरा खेड्यात वसतो..
माणूसपण माणसाचं
खरे दर्शन येथे च घडतं..
शेजार धर्म पाळणारे
माणुसकीचे ऋणानुबंध,
बघायचे तर खेड्यात यायचं..
दोन घास तरीही मिळाला
सगळे आनंदाने खाई
सुख समाधान झोपडीत
बघा गाणी रे गाई..
सणासुदीला नाही अपुरे
ऐपतीप्रमाणे सगळे करती..
नाही दुजाभाव येथे
गुण्यागोविंदाने ते जगती..
कामचुकार नाही दोष
कष्टकरी खेडेपाडी..
जगाला तो शेतकरी
भारत देश माझा जगी..
म्हणून तर गड्यानो एखादा
चला एखादा ग्रामीण भारत बघू
आपल्या संस्कृतीची आपण
थोडी झाकी रे बघू...
तेव्हा च भारत टिकले माझा
सभ्यता ही नांदेल मनी
सभ्यता ही नांदेल मनी...
