ग्रामीण भारत
ग्रामीण भारत
1 min
402
संस्कृतीचे खरे दर्शन
म्हणजे ग्रामीण भारत..
भावनांचे आहे माहेर
हा माझा ग्रामीण भारत..
सभ्यता, एकता नांदे
बहु भाषिक ही खेडी..
कष्टकरी, श्रमदान
समाधानी ही खेडी..
सणवाराची ही रेलचेल
आपुलकी आवभगत..
माणुसकीचे खरे दर्शन
अशी गुणा गोविंद्याने जगत..
कुठे बघायचा देश माझा
बघू हा ग्रामीण भारत..
देशात कुठे काय माझ्या
चला बघू ग्रामीण भारत..
नैसर्गिक सुंदरता
जेथे आज जपली
नदी झरे डोंगरे
रान ही ती हसली..
देश खाई जे अन्न
पिकवतो ग्रामीण भारत..
नाही शहरीकरण
आहे अजूनही ग्रामीण भारत..
