ग्रामीण भारत
ग्रामीण भारत
1 min
203
ग्रामीण भारत जान आमुची
तिथेच होती अधिक वस्ती आमुची
शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध राहणी
तिथे नव्हती भावना एकदूजेपणाची
शतक बदललं,वारं फिरलं
नवयुगाचं याड खेडयालाही लागलं
नवे तंत्र, नवे विचार, नवा काळ
विसरून गेला खेडूत आपला जुना काळ
शिक्षण घेतलं,शिंग फुटलं
मूल शहराकडे धावलं
म्हातारं आई-बाप खेड्यातच राहिलं
एकटेपणाची शिक्षा भूगत राहिलं
नव्या तंत्राची गोडी गावानं बी चाखली
खेडी नव्यानं उभी की राहिली
पुन्हा जीवात जीव आला
सुखाचा वारा वाहू लागला
भरकटलेलं मूल घराकडं आलं
आई-बापाच्या चेहऱ्यावर हसू की हो फुटलं
