STORYMIRROR

Savita Kale

Others

4  

Savita Kale

Others

ग्रामीण भारत

ग्रामीण भारत

1 min
127

प्रगतीची खरी सुरूवात इथे आहे

संपन्न असा हा ग्रामीण भारत आहे ।।


वॉटरपार्कला लाजवणारा निर्मळ झरा इथे आहे

ए. सी. चे काम काय? गार वारा इथे आहे ।।


पोटाची खळगी भरून माणूस निवांत आहे

रात्रीला लागणारी झोप त्याची शांत आहे ।।


कमी असली कमाई तरी खर्चाचा मेळ आहे

कुटुंबाला देण्यासाठी इथे खरा वेळ आहे ।।


प्रदूषणाला रोखणारी शुद्ध हवा इथे आहे

शहरातील आजारांची खरी दवा इथे आहे ।।


मुलांना खेळाया रान खुले सारे आहे

निखळ त्यांना हसवणारे आनंदाचे वारे आहे ।।


श्रीमंती कमी पण सुखाचा घास आहे

ग्रामीण भारत म्हणजे 'मोकळा श्वास' आहे ।।


Rate this content
Log in