STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

ग्रामीण भारत...!

ग्रामीण भारत...!

1 min
425

पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर

नशीब देशाचे बलवत्तर

आग्न्येय नैऋत्य वायव्य ईशान्य

देश सुंदर दुसरा नाही अन्य....

कर्क वृत्ताची मध्य रेषा

सर्व ऋतूंची राखे अभिलाषा

सुजलाम सुफलाम देश आपला

असल्या जरी अनेक भाषा....

जात धर्म पंथ अनेक

एकाहून एक सरस

जो तो इथे आपल्या धर्माचा

वाली आपापल्या कर्माचा....

पहाटे वसुदेवाची गोड वाणी

ऐकण्यास मिळते आणता पाणी

सण वार व्रत वैकल्य

घालवितात मनानातील शैल्य....

घराघरातील भाऊबंदकी

वारसा सांगते आपल्या जातीचा

रामायणातील सात्विकता

महाभरतासह राखते मान आपल्या जातीचा...

ग्रामीण शहरी द्वंद्व जुने

काढतात सहजी उणे दुणे

ग्रामीण भागाची शालीनता घेऊन

देश पाहतो स्वप्न नित्य नवे ....

गल्ली पासून दिल्ली पर्यंत

वाढते सदैव देशाची शान....!

शहरा पेक्षा ग्रामीण भागातच

जपतो आपण देशाची जान ...

ग्रामीण भारत ग्रामीण भारत

म्हणता म्हणता होतो उद्धार देशाचा

आळस झटकुनी उठता

कायापालट होत आहे देशाचा....

हरित क्रांती,औद्योगिक क्रांती

म्हणता म्हणता आली डिजीटल क्रांती

पाहता पाहता झटली भ्रांती

अंतरात पाहता बसून एकांती....

प्रगतीच्या वाटेवरती चालता

सौख्य समाधान शांतीही पाहू

देश घडविता घडविता चला

ग्रामीण भगचाही आता उद्धार करू....!


Rate this content
Log in