ग्रामीण भारत
ग्रामीण भारत
1 min
241
माझ्या गावाकडची वाट खरतड
प्रेम ओथंबते कणाकणात परखड
हिरव्या रानात शेतकरी राबतो
त्याची महती लिहीणे अवघड.....
गुरांच्या गळ्यातल्या घुंगरमाळा
चिमण्या पाखरांचा किलबिलाट भोळा
माणसामाणसातली माणुसकी
सामंजस्याचा गुण निराळा
नदीओढ्याचे पाणी निर्मळ
सुगंधी वारा मोहक परिमळ
पाचवारीत लाजणार्या परंपरेत
सदैव दिसतो डोक्यावर पदर
फळभाज्यांनी फुललेल्या बागा
ठिपक्याची रांगोळी नि अंगण सुंदर
वृंदावनातल्या तुळशीमधुनी
इथेच घडते संस्कृती दर्शन !!!!
