गोष्टीतलीआजी
गोष्टीतलीआजी
नादी लावण्या लहान्यांना, अश्या बाता मारायची.
कधी काळी घोकलेल्या, कधी मनाच्या गोष्टी सांगायची.
श्वास भरत नव्हता एका दमात, तर मध्येच थांबायची.
थोडासा मसाला लाऊन, गोष्ट पुन्हा नव्याने मांडायची.
चल रे भोपळ्या टुणुक टुणुक, कधी उड्या घ्यायची.
कासवाच्या शर्यतीत हरलेल्या, सश्यासारखी झोपून दाखवायची.
चांदण्याच्या जत्रेत झोपून, चिऊ काऊ बोलायची.
थांब माझ्या बाळाला तेल लाऊ दे, डोक माझ चोळायची.
लबाड लांडग्याचे ढोंग, मुंगीच्या हत्तीचे सोंग रंगवायची.
राजा राणी च्या गोष्टीत, चक्क मला राजकुमार बनवायची.
बोबड्याच्या गोष्टीत, स्वता बोबडे होऊन वागायची.
डोळे पेंगता माझे, निंबोणीच्या झाडामागे हळूच गुणगुनायची.
तिच्या प्रत्येक शब्दाला, मायेची ममता जानवायची.
आजीच्या गोष्टीत पन, गोष्टीतली आजी असायची.
