गोष्ट..!
गोष्ट..!
गोष्ट घडली साधी सुधी
एक पोर भेटल रस्त्यामधी
असेही धडते कधी कधी
काहीतरी गवसते आधी मधी
श्रद्धा कि अंधश्रद्धा
मी काही जाणत नाही
पण या द्वंद्वात काहीतरी
घडल्या शिवाय रहात नाही
रस्त्यात एक कुमारवयीन
मुलगा मला भेटला
त्याने दहा रुपयांसाठी
सहजच हात पुढे केला
दहा रुपये हातात पडता
त्याने नोट गायब केली
आणि साईबाबांच्या नावाने
हातावर माझ्या एक ताईत ठेवली
नवल वाटले मला
त्या कुमारवयीन मुलाचे
दाखवून दिले त्याने
मूळ आपल्या देशाचे
काहीही जीवनात घडू शकत
हे मला शिकायला मिळालं
अंधश्रद्धेच श्रद्धेत रूपांतर
कस होत हे जाणता आलं
आजही तो ताईत माझ्याकडे
तसाच ठेवलेला आहे
जो मला श्रद्धा काय असते
ते तो मला शिकवत आहे
नवल वाटलं त्याच्या चलाखीच
त्याहून त्याच्या बाबांवरच्या श्रद्धेच
त्यांन त्याच स्थान जाता जाता
पक्क केल माझ्या मनात कायमच
दाखवून दिलं त्यांन
या देशात काहीही घडू शकत
बोलघेवड्या माणसाला
या जगात काही कमी नसत
दुनिया झुकती है,झुकानेवाला चाहिये
हर एक दिन एक नया फँडा चाहिये
जरी कोणामुळे कोणाच अडत नाही
तरी श्रद्धेविना जगण्यात काही अर्थ नाही....!
