गोंधळी
गोंधळी
1 min
310
पुलकीत झाली रेशीम रेषा
आखीव रेखीव रांगोळी
हेमंत धुक्यात विसावली
जरतारी मोती कचोळी
अंतरीक्षातून पक्षी उतरला
अधीर झाला तो रातवेळी
महिरपी नक्षी मेघडम्बरी त्या
सचैल कच्च भिजला जळी
क्षणा क्षणाला चोच मारुनी
फिरवीत राहिला मासोळी
वारा विंझण घालीत फुगडी
पेटली पोत ती श्री देवीची
घालून गोंधळ वाजवी सम्बळ
नाचु लागला तो गोंधळी
रात सरली पहाट विझली
तृप्त पक्षी माया ती वेंधळी
