गोळाबेरीज
गोळाबेरीज
आयुष्याच्या संध्याकाळी, सूर्यास्ताच्या साक्षीने विसावले दोघे क्षणभर,
निवांतपणा लाभला अखेर जीवास पळभर.
तेवते निरांजन देवघरात ,
निरव शांततेचे ते मूक साक्षीदार.
धूसर झाल्या आठवणी स्मृतिपटलावर,
पसरले जाळे सुरकुत्यांचे अंगावर ,
परी उमटले नाही जाळे आठयांचे कपाळावर.
नाही सोडले उसासे , नाही वाहले अपेक्षांचे ओझे.
समाधानी , तृप्त आयुष्य तयांचे,
राग- लोभ धरणे नाही जमले तयांसी
म्हणुनी आयुष्याच्या संध्याकाळी नाही पडले एकाकी.
भूतकाळास न कवटाळिता उराशी,
केले वर्तमानास सुगंधी.
गोळाबेरीज केली असता, उणे झाले नाही काही,
मात्र प्रेमाची शिल्लक राहिली बाकी काही.
