गोकुळातील कृष्ण
गोकुळातील कृष्ण
1 min
169
वासूदेव व देवकी
यांचा हा राज कुमार
सृष्टी पालक श्रीकृष्ण
श्रीविष्णूंचा अवतार...
यमुनेच्या तीरावर
नंद यशोदा पालक
गोकुळात बाललीला
घनश्याम तो बालक ...
पोटासाठी सवंगडी
दही दूधाच्या घागरी
चोरी करतो कान्हा तो
गोप्या आळ घेती खरी ...
गोकुळात इंद्रोत्सव
गोप साजरा करत
पाऊसात उचलला
गोवर्धन तो पर्वत...
गोपी समवेत खेळे
रास क्रीडा रचियेती
रास लीला आनंदात
गोकुळात त्या खेळती ....
वृंदावनी सारंग हा
करी नानाविध लीला
करू नमन कान्हाला
प्रेम संदेशात दिला ...
